शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात भिका-यानेच केला भिका-याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 22:08 IST

:नाशिक : गंगाघाटावरील रामकुंड परिसरात फिरस्त्या असलेल्या दोघा भिका-यांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिका-याने दुस-या भिका-याच्या पायावर चाकूने वार तसेच हाताच्या चापटीने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़ अरूण भामरे (५६) असे खून झालेल्या भिका-याचे नाव असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मूळचा उत्तर प्रदेशातील ...

ठळक मुद्देपंचवटी कारंजा परिसर ; रामकुंडावरील घटनाबॅग फाडल्याचा राग ; बेदम मारहाण करून खून

:नाशिक : गंगाघाटावरील रामकुंड परिसरात फिरस्त्या असलेल्या दोघा भिका-यांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिका-याने दुस-या भिका-याच्या पायावर चाकूने वार तसेच हाताच्या चापटीने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़ अरूण भामरे (५६) असे खून झालेल्या भिका-याचे नाव असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मूळचा उत्तर प्रदेशातील ब-हाणपूर येथील भिकारी संशयित अनिल बाबुराव आपटे (५४) यास ताब्यात घेतले आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामकुंड परिसरात मयत भामरे व संशयित आपटे हे दोघेही फिरस्ते असून ते भिक्षा मागण्याचे काम करतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत रामकुंड परिसरात बसलेले असतांना भामरे याने आपटे याची बॅग फाडली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला व संतापलेल्या आपटेने भामरेला चापटीने मारहाण करीत छोटया चाकूने डाव्या पायावर वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेला भामरे हा घटनास्थळी तसाच पडून होता तर त्याच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता़ त्यास १०८ अ‍ॅम्ब्युलन्स वाहनातून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़भामरेचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले यांनी पंचवटी परिसरात चौकशी केली असता सायंकाळी दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाल्याची माहिती एका महिलेकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार सचिन म्हस्दे, विलास बस्ते, सतीश वसावे, भूषण रायते आदिंनी होळकर पुल, गंगाघाट, स्मशानभूमी, टाळकुटेश्वर पूल, भद्रकाली परिसरात संशयिताच्या वर्णनावरून शोध सुरू केला तब्बल सहा तासानंतर गंगाघाटावरील दत्त मंदिराजवळून आपटे याला ताब्यात घेतले़ त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे तपासात समोर आले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मुंढे करीत आहेत.यापुवीर्ही झोपण्याच्या वादातून भिका-याचा खूनपंचवटी कारंजा परिसरात काही महिन्यांपुर्वीच झोपण्याच्या वादातून एका भिका-याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ त्यानंतर आता पुन्हा रामकुंड परिसरात भिका-याच्या खूनाची घटना घडली आहे़