शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये एक लाखाचा नायलॉन मांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:36 IST

नाशिक : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जिवीतास धोका पोहोचत असल्याने शासनाने विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री करणा-या विक्रे त्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकला़ सराफ बाजारातील तांबोळी वाड्यात टाकण्यात आलेल्या या ठिकाणाहून एक लाख रुपयांचा मांजा जप्त केला असून संशयित राजेंद्र तांबोळी या विक्रेताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचा तांबोळी वाड्यात छापा एक लाख ६५० रुपये किमतीचे २११ नायलॉन मांजा गट्टू जप्त

नाशिक : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जिवीतास धोका पोहोचत असल्याने शासनाने विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री करणा-या विक्रे त्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकला़ सराफ बाजारातील तांबोळी वाड्यात टाकण्यात आलेल्या या ठिकाणाहून एक लाख रुपयांचा मांजा जप्त केला असून संशयित राजेंद्र तांबोळी या विक्रेताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

जानेवारी महिन्यातील मकर संक्रातीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ संक्रातीनिमित्त बालगोपाळ मोठ्या संख्येने पतंग उडवितात़ यावेळी आपली पतंग कटू नये यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो़ मात्र, पशूपक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाची निर्मिती व विक्रीस महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे़ मात्र, असे असले तरी तरी नायलॉन मांजाची चोरीछुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते़ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख यांना सराफ बाजारात नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती़

वरीष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांनी या माहितीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर सराफ बाजारातील तांबोळी वाड्यात सापळा रचून छापा टाकण्यात आला़ या ठिकाणी संशयित राजेंद्र सदाशिव तांबोळी यांचे तांबोळी पूजा-भांडाराचे दुकान असून येथूनच नायलॉन मांजाची विक्री सुरू होती. पोलिसांनी या ठिकाणाहून एक लाख६५० रुपये किमतीचे २११ नायलॉन मांजा गुंडाळलेले गट्टू जप्त केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तांबोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा