शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील ‘निकम गँग’ला मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:24 IST

नाशिक : पंचवटीच्या फुलेनगरमधील सराईत निकम गँगचा म्होरक्या शेखर निकमसह त्याच्या उर्वरीत चौघा साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त डॉ़रविंद्रकुमार सिंगल यांनी पाठविलेल्या मोक्काच्या (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाईच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असून या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई केली आहे़ या गँगविरोधात खून, खंडणी, हाणामाारी अशो अनेक केसेस आहेत़पंचवटीच्या फुलेनगर परिसरातील भराडवाडीतील सराईत ...

ठळक मुद्देसराईत गुन्हेगार शेखर निकम व त्याच्या चौघा साथीदारांविरोधात मोक्कासंदीप लाड या युवकाकडे खंडणी ; खंडणीस विरोध केला म्हणून गोळी मारून ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिक : पंचवटीच्या फुलेनगरमधील सराईत निकम गँगचा म्होरक्या शेखर निकमसह त्याच्या उर्वरीत चौघा साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त डॉ़रविंद्रकुमार सिंगल यांनी पाठविलेल्या मोक्काच्या (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाईच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असून या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई केली आहे़ या गँगविरोधात खून, खंडणी, हाणामाारी अशो अनेक केसेस आहेत़

पंचवटीच्या फुलेनगर परिसरातील भराडवाडीतील सराईत गुन्हेगार शेखर निकम व त्याच्या चार साथीदारांनी संदीप लाड या युवकाकडे वेळोवेळी खंडणी मागून खंडणीस विरोध केला म्हणून गोळी मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़ त्यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खंडणी, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक के़डी़वाघ यांनी सराईत गुन्हेगार शेखर राहुल निकम व त्याच्या साथिदारांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठविला होता़ या प्रस्तावानुसार शेखर राहुल निकम याच्यावर नऊ गुन्हे, विशाल चंद्रकांत भालेराव याच्यावर १४, संतोष प्रकाश पवार याच्यावर एक, केतन राहुल निकम याच्यावर १ तर संदीप सुधाकर पगारे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत़पोलीस उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत़