शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ११ डिसेंबरपासून नाशिक कबड्डी लीग सिझन-२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:47 IST

नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १७ डिसेंबर दरम्यान ‘नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग सिझन-२’ या राज्यस्तरीय प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक आणि अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये ७८ राष्ट्रीय खेळाडूंची निवड

नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १७ डिसेंबर दरम्यान ‘नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग सिझन-२’ या राज्यस्तरीय प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक आणि अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.केव्हीएन नाईक नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग सिझन-१ च्या विभागीय स्तरावरील आयोजनानंतर यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत दादाजी आव्हाड, आदीनाथ गवळी, मोबीन शेख, प्रशांत जाधव, विवेक नाडार यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय  खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.सदर स्पर्धेत यजमान नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांतील ७८ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांची विभागणी सहा संघांत करण्यात आली आहे. सर्वज्ञ रायडर्स, एबीसी रॉयल फायटर्स, नाशिक लायन्स, सिन्नर सायलेंट किलर, कान्हैया चॅलेंजर, दिंडोरी डिफेंडर या संघांचा समावेश आहे. यावेळी सिन्नर सायलेंट संघाचे संघ मालक विश्वनाथ शेळके, एबीसी संघाचे अजित बने, राजेंद्र कातोरे, कन्हैया चॅलेजर संघाचे भूषण घुगे, सुहास आव्हाड, दिंडोरी डिफेंडर्सचे राजेश दरगोडे, सर्वज्ञ रायडर्सचे विशाल संगमनेरे, नाशिक लायन्सचे किरण फड यांचा सत्कार करण्यात आला.११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते रात्री १० या दरम्यान मॅटवरील मैदानावर प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहे. पंधरा साखळी सामने आणि ४ बाद फेरीचे असे १९ सामने होणार आहेत. पहिले पाच दिवस रोज तीन सामने आणि सहाव्या दिवशी उपांत्य फेरीचे व अंतिम दिवशी तृतीय, चतुर्थ व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडाKabaddiकबड्डी