नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:31 IST2017-10-27T16:02:09+5:302017-10-27T16:31:28+5:30

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून युवकाचा खून
नाशिक : अनैतिक संबंधातून पेठरोडवरील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या दशरथ बाळू ठमके या 27 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.27) दुपारी तीन वाजता उघडकीस आली.
पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजारसमिती जवळ असलेल्या जलकुंभाजवळील पाण्याच्या टाकीत ठमके याचा मृतदेह आढळून आला आहे. ठमके हा गेल्या 21 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाल्याने त्याचा भावाने पंचवटी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. मयताची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांनी ठमके याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी संशयित गणेश वसंत गरड (रा़पंचवटी) यास ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, आदींसह कर्मचारी दाखल झाले आहेत.