शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील सराईत घरफोड्या नेपाळमध्ये हॉटेल व्यवसायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:23 IST

नाशिक : नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे त्या ठिकाणी हॉटेल्स खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी येणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ टागोरनगरमधील भरत गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे दागिने चोरल्याच्या गुन्ह्यासह आणखी ...

ठळक मुद्देगणेश भंडारेला अटक : १४ लाखांचे सोने जप्तमुंबईतील खरेदीदारास अटक

नाशिक : नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे त्या ठिकाणी हॉटेल्स खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी येणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ टागोरनगरमधील भरत गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे दागिने चोरल्याच्या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यांची कबुली संशयित भांडारे याने दिली असून त्याच्याकडून १४ लाख रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने हस्तगत केले असून चोरीचे सोने विकत घेणाºया मुंबईतील एका संशयितास अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल यांनी बुधवारी (दि़२१) पत्रकार परिषदेत दिली़

सिंगल यांनी सांगितले की, आॅक्टोबर २०१६ मध्ये टागोरनगरमध्ये भरत दीपचंद गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिण्याची चोरी केल्याची घटना घडली होती़ संशयित गणेश भंडारे यानेच ही घरफोडी केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते, मात्र या घटनेनंतर तो नेपाळमध्ये फरार झाला होता़ नेपाळमध्ये त्याच्या शोधासाठी गेलेल्या पथकास गुंगारा मारण्यात भंडारे यशस्वी झाला होता़ शहर गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना भंडारे नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळाली होती़ व्हॅलेंटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी रोजी युनिट एकने सीबीएस परिसरात भंडारे यास सापळा लावून अटक केली़

संशयित भंडारेची कसून चौकशी केल्यानंतर त्याने उपनगरमध्ये दोन तर गंगापूर पोलीस ठाण्यात एक अशा तीन घरफोड्यांची कबुली दिली़ घरफोडीतील चोरीचे सोने पॉलिश करून देणारा तसेच खरेदी करणारा मुंबईतील दीपक देवरुखकरची माहिती दिल्यानंतर त्यासही मुंबईतून अटक करण्यात आली आहे़ या दोघांकडून तीन घरफोड्यांमधील सुमारे १३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे़ आयुक्त डॉ. सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक नागेश मोहिते, महेश कुलकर्णी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली़रिसॉर्ट खरेदीसाठी पैशांची आवश्यकतासराईत भंडारे याने नेपाळी युवतीशी विवाह केला व चोरीच्या पैशातून दोन हॉटेल खरेदी केली़ आणखी एक रिसोर्ट खरेदी करण्यासाठी त्यास पैशांची आवश्यकता असल्याने तो नाशिकला आला होता़ नाशिकमध्ये घरफोडी करून त्या पैशातून हे रिसॉर्ट खरेदी करायचे होते. दरम्यान, नाशिक पोलीसांनी भंडारेच्या शोधासाठी इंटरपोलकडेही प्रस्ताव दिला होता.

टॅग्स :NashikनाशिकThiefचोरArrestअटक