नाशिक: सिन्नरजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात ३ ठार
By Admin | Updated: November 22, 2015 18:53 IST2015-11-22T11:04:39+5:302015-11-22T18:53:02+5:30
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ एक जीप व ट्रकची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार तर १८ जण जखमी झाले

नाशिक: सिन्नरजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात ३ ठार
ऑनलाइन लोकमत
सिन्नर, दि. २२ - नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ एक जीप व ट्रकची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार तर १८ जण जखमी झाले आहेत. काल रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास वावी पांगरीजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळचे रहिवासी असल्याचे समजते.
शहापूरहून शिर्डीच्या दिशेने जाताना पिकअप ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक झाली. अपघाताचे वृत्त कळताच आसपासच्या परिसरातील तरूणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासांठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तीन जणांचा मृत्यू झाला, त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते.