१५ जूनपासूून नाशिक-पुणे विमानसेवा

By Admin | Updated: June 3, 2015 01:52 IST2015-06-03T01:52:36+5:302015-06-03T01:52:36+5:30

ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी खासगी कंपनीने पुढाकार घेतला असून, नाशिक- पुणे सेवा १५ जूनपासून

Nashik-Pune service from June 15 | १५ जूनपासूून नाशिक-पुणे विमानसेवा

१५ जूनपासूून नाशिक-पुणे विमानसेवा

नाशिक : ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी खासगी कंपनीने पुढाकार घेतला असून, नाशिक- पुणे सेवा १५ जूनपासून सुरू करण्याची तयारी कंपनीने केली आहे. त्यामुळे रखडलेल्या विमानसेवेला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
नाशिकमध्ये ओझर-जानोरी शिवारात वर्षभरापूर्वीच सुसज्ज विमानतळ बांधण्यात आले असून नागरी हवाई सेवा मात्र अजून सुरू झालेली नाही. हवाई सेवेसाठी गंगापूर धरणातून सी प्लेन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मेहेर कंपनीनेच पुढाकार घेतला आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ वर्मा आणि संचालक एस. के. मन यांनी नाशिकमध्ये ‘तान’च्या (ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ नाशिक) पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
त्यानंतर बोलताना, कुंभमेळ््याच्या पार्श्वभूमीवर ही सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला. सुरुवातीला छोटे म्हणजे ९ आसनी विमान वापरण्यात येईल. पर्यटन विकास महामंडळाच्या
मदतीने ही सेवा सुरू होणार असून
४५ मिनिटांत पुण्याला पोहोचता येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik-Pune service from June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.