शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:54 IST

Sudhakar Badgujar Sanjay Raut News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली. या राजकीय कारवाईनंतर एक स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. ज्याला बडगुजर यांनी दुजोरा दिला आहे. 

Sanjay raut Sudhakar Badgujar: नैऋत्य मोसमी वाऱ्यांबरोबरच राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकीय पक्षांनी महापालिका ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, दुसरीकडे पक्षांतराच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाशिकमधील महत्त्वाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. त्याच कारण म्हणजे अचानक त्यांची पक्षातून करण्यात आलेली हकालपट्टी! उद्धव ठाकरेंच्या शि्वसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यात खासदार संजय राऊत आणि सुधाकर बडगुजर यांच्यातील संवाद आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यातच त्यांनी गिरीश महाजन यांच्यासोबत फोटोही काढला आणि मुद्दा अधिक चिघळल्याचे दिसले. त्यातून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. 

संजय राऊत, सुधाकर बडगुजर यांच्यातील संवाद व्हायरल

नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या समवेत फोटो काढून भेट घेतल्याने खासदार संजय राऊत यांनी बडगुजर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भातील दोघांचे व्हाटस्अॅप चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

वाचा >>काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांच्या समवेत फोटो काढतात, असे राऊत यांनी म्हटले असून त्यावर बडगुजर यांनी उद्धवसेनेचेच खासदार अरविंद सावंतही स्टेजवर होते, असे उत्तर बुधवारी दिले आहे. या चॅटिंगची बुडगुजर यांनी पुष्टी केली आहे. 

सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजप उघडले दरवाजे

ठाकरेंच्या शिवसेनेने पक्षातून बाहेर काढलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपने दरवाजे खुले केले आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत गिरी महाजन लक्ष घातल आहेत. पक्ष वाढीसाठी सर्वांना दारे खुली आहेत, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (५ जून) नाशिकमध्ये बोलताना केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNashikनाशिकPoliticsराजकारण