नाशिक महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली
By Admin | Updated: July 8, 2016 01:34 IST2016-07-08T01:34:23+5:302016-07-08T01:34:23+5:30
प्रशासनाला करडी शिस्त लावण्याबरोबरच विविध निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. आयुक्तपदी

नाशिक महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली
नाशिक : प्रशासनाला करडी शिस्त लावण्याबरोबरच विविध निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. आयुक्तपदी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली असून गेडाम यांची मुंबईला विक्रीकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
एप्रिल २०१४मध्ये आयुक्त संजय खंदारे यांची बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेला तब्बल सात महिने पूर्णवेळ आयुक्त नव्हता. सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपल्यानंतर शासनाने ७ नोव्हेंबर २०१४ रोजी आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आणि १० नोव्हेंबर २०१४ रोजी गेडाम यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमधील माणूस म्हणून गेडाम यांची चर्चा सदैव होत राहिली.
गेडाम यांनी काही धडाकेबाज निर्णय घेत प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्येही वचक निर्माण केला. ऐन सिंहस्थाच्या तोंडावर नियुक्ती झालेल्या आयुक्तांनी ‘आधी सिंहस्थ, मग प्रभागातील विकास’ ही भूमिका घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन यांच्यात संघर्षाची बिजे पेरली गेली. (प्रतिनिधी)