श्रीनगरमध्ये नाशिकच्या जवानाचे निधन
By Admin | Updated: September 11, 2016 16:37 IST2016-09-11T15:06:56+5:302016-09-11T16:37:04+5:30
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाकी खू गावातील जवान शहाजी गोपाळ गोरडे यांचे श्रीनगर येथे शनिवारी निधन झाले.

श्रीनगरमध्ये नाशिकच्या जवानाचे निधन
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाकी खू गावातील जवान शहाजी गोपाळ गोरडे यांचे श्रीनगर येथे शनिवारी निधन झाले.
अत्यंत गरीब परस्थितीतून शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या मागे आई,वडील तीन बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव श्रीनगर येथून निघाले असून संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईत दाखल होईल. रात्री १०.३० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव देवळाली कॅम्प येथे पोहोचेल. सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे वाकी खू गावचे सरपंच विक्रम जगताप यांनी सांगितले.