नाशिकमध्ये हेमंत गोडसे आघाडीवर
By Admin | Updated: May 16, 2014 09:37 IST2014-05-16T09:36:54+5:302014-05-16T09:37:44+5:30
नाशिक येथे दुसर्या फेरीअखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर १३ हजार ९९३ मतांची आघाडी घेतली आहे.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे आघाडीवर
नाशिक : येथील मतदारसंघाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून दुसर्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर १३ हजार ९९३ मतांची आघाडी घेतली आहे. तर दिंडोरीतून भाजपाचे हरिचंद्र चव्हाण यांनी ३१ हजार ३३४ मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांना मागे टाकले आहे.
येथील सर्कीट हाऊसला सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यात नाशिकमध्ये दुसर्या फेरीत गोडसे यांना ५१ हजार ६११ तर भुजबळ यांना ३७ हजार ६१८ मते प्राप्त झाली आहेत. दिंडोरीत चौथ्या फेरीअखेर चव्हाण यांना ८0 हजार ४८ तर भारती पवार यांना ४८ हजार ७१४ मते मिळाली आहेत.