नाशिकच्या ८२ आदिवासी खेड्यांचा बाजार ओस
By Admin | Updated: June 1, 2017 13:47 IST2017-06-01T13:47:27+5:302017-06-01T13:47:27+5:30
येथील गिरणारे गावात दर सोमवारी आठवडे बाजार भरतो;मात्र आज हा बाजार पुर्णपणे ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नाशिकच्या ८२ आदिवासी खेड्यांचा बाजार ओस
अझहर शेख / लोकमत आनॅलाइन
नाशिक : येथील गिरणारे गावात दर सोमवारी आठवडे बाजार भरतो;मात्र आज हा बाजार पुर्णपणे ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. गिरणारे हे शहरापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. या गावालगत सुमारे ८२ लहान मोठी खेडी व आदिवासी पाडे आहेत. या आदिवासी वस्तींवरील रहिवाशांचा आठवडे बाजार हा हक्काचा असतो. गोरगरीब आदिवासी गिरणारे बाजारातून भाजीपाला व आदि तत्सम गरजेच्या वस्तू खरेदी करतात. मात्र शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे गिरणारे बाजार भरला नाही. तसेच व्यावसायिकांनीदेखील स्वयंस्फूर्तीने राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि शेकतऱ्यांना पाठिंबा म्हणून दुकाने बंद ठेवली. गिरणारे गाव हे शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात मोठ्या संख्येने द्राक्षे, टोमॅटो यांचे फड आहेत. मनुका कंपनी, टोमॅटो कंपनीकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी के ला जातो; मात्र सर्व व्यवहार आज ठप्प होते.