एनएसजीने सोपवला घटनास्थळाचा अहवाल
By Admin | Updated: July 14, 2014 04:34 IST2014-07-14T04:34:42+5:302014-07-14T04:34:42+5:30
रासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट झाल्यानंतर नॅशनल सिक्युरिटी गार्डने (एनएसजी) केलेल्या दोन दिवसांच्या पाहणीचा अहवाल गुप्तचर यंत्रणांना सादर केला आहे.

एनएसजीने सोपवला घटनास्थळाचा अहवाल
पुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट झाल्यानंतर नॅशनल सिक्युरिटी गार्डने (एनएसजी) केलेल्या दोन दिवसांच्या पाहणीचा अहवाल गुप्तचर यंत्रणांना सादर केला आहे. परंतु या अहवालात नेमके काय नमूद करण्यात आले याबाबत यंत्रणांकडून गुप्तता राखण्यात येत आहे.
गुरुवारी दुपारी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या न्यायवैद्यक अहवालाच्या प्रतिक्षेत एटीएस आहे. सोमवारी हा अहवाल मिळण्याची शक्यता आहे. बॉम्बमध्ये नेमके कोणते पदार्थ वापरण्यात आले, हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालामधूनच स्पष्ट होणार आहे.