नाशिकमध्ये आढळला शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मृतदेह
By Admin | Updated: September 17, 2016 12:16 IST2016-09-17T12:10:36+5:302016-09-17T12:16:29+5:30
माजी नगरसेवक अर्जून गांगुर्डे यांचा मृतदेह आढळला आहे. पहाटे गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना समोर आली.

नाशिकमध्ये आढळला शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मृतदेह
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - माजी नगरसेवक अर्जून गांगुर्डे यांचा मृतदेह आढळला आहे. पहाटे गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना समोर आली. पेठरोडवरील इंद्रप्रस्थनगरी समोरील मेघराज बेकरीमागे असलेल्या मोकळ्या पटांगणात एका गाडीत (क्रमांक MH 15 CT 0941) हा मृतदेह आढळून आला. अर्जून गांगुर्डे शिवसेनेचे माजी नगरसेवक असून विद्यमान भाजपा नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांचे पती आहेत. अर्जून गांगुर्डेंची हत्या करण्यात आली की आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.