नाशिकमध्ये भाजपाला खिंडार
By Admin | Updated: January 29, 2017 20:56 IST2017-01-29T20:56:19+5:302017-01-29T20:56:19+5:30
भाजपाच्या नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस सोमनाथ बोडके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

नाशिकमध्ये भाजपाला खिंडार
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस सोमनाथ बोडके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार यांच्याच प्रभागातील नगरसेवक आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकारी यांनीच मनसेत प्रवेश केल्याने नाशिकमध्ये भाजपाला खिंडार पडल्याची चर्चा आहे.