रेल्वे दरोड्याप्रकरणी नाशिकचे १० अटकेत
By Admin | Updated: August 4, 2015 00:56 IST2015-08-04T00:56:26+5:302015-08-04T00:56:26+5:30
हावडा-मुंबई मेलमध्ये दोन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याप्रकरणी नाशिकच्या १० तरुणांना नाशिक व शिर्डी येथून अटक करण्यात आली आहे

रेल्वे दरोड्याप्रकरणी नाशिकचे १० अटकेत
भुसावळ : हावडा-मुंबई मेलमध्ये दोन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याप्रकरणी नाशिकच्या १० तरुणांना नाशिक व शिर्डी येथून अटक करण्यात आली आहे. ३१ जुलैच्या रात्री १२़३० हावडा मेल एक्स्प्रेसने मनमाड स्टेशन सोडल्यानंतर सर्वसाधारण डब्यात १० दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडील मोबाइलसह १२ हजारांची रोकड लांबवली होती़
भुसावळ लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व मनमाडचे प्रभारी उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने आरोपींना शिर्डी व नाशिक येथून अटक केली़ त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील ७ आरोपी शिर्डीत एका मिरवणुकीत नाचत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. २० ते २५ वयोगटातील हे आरोपी नाशिक रोड, जेलरोड, गोरेवाडी, एकलहरे परिसरातील आहेत. अवघ्या ४८ तासांत दरोडेखोरांना जेरबंद केल्याबद्दल उपअधीक्षक देसले व त्यांच्या सहकाऱ्यांना १५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे़ (प्रतिनिधी)