नर्मदा आंदोलकांची पोलिसांशी झटापट

By Admin | Updated: September 11, 2015 03:00 IST2015-09-11T03:00:43+5:302015-09-11T03:00:43+5:30

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न आणि पेसा कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात नर्मदा बचाव आंदोलनतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट

Narmada agitators clash with police | नर्मदा आंदोलकांची पोलिसांशी झटापट

नर्मदा आंदोलकांची पोलिसांशी झटापट

नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न आणि पेसा कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात नर्मदा बचाव आंदोलनतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही वेळ तणावही निर्माण झाला होता. नर्मदा बचाव आंदोलनतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांना अडविण्यात आले असता महिला मोर्चेकरी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली आणि नंतर झटापटही झाली.

Web Title: Narmada agitators clash with police