नरेंद्र नव्हे, मौनेंद्र मोदी!
By Admin | Updated: July 30, 2014 02:50 IST2014-07-30T02:50:44+5:302014-07-30T02:50:44+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या धोरणांवर मौन धारण केलेल्या मोदींचा उल्लेख ‘मौनेंद्र मोदी’ अशा उपहासात्मक शब्दांत केला.

नरेंद्र नव्हे, मौनेंद्र मोदी!
मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र : केंद्र सरकारच्या धोरणांवर पंतप्रधानांचे मौन
मुंबई : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल करीत त्यांची हुकूमशहासारखी कार्यशैली असून लोकशाहीसाठी ती अत्यंत घातक असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना केली. सरकारच्या धोरणांवर मौन धारण केलेल्या मोदींचा उल्लेख त्यांनी ‘मौनेंद्र मोदी’ अशा उपहासात्मक शब्दांत केला.
निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जी स्वप्ने दाखविली होती, ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तराखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपाला नाकारून काँग्रेसच्या पारडय़ात आपले मत टाकले, असे सांगून चव्हाण म्हणाले, की गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींची कार्यपद्धती हुकूमशहासारखी होती, हे काँग्रेसला माहिती होते. त्यामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीतही हुकूमशाही येण्याचा धोका व्यक्त केला होता. आता हे सर्व लोकांसमोर आले.
केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांना कसे वागविले जाते, मंत्र्यांना किती स्वातंत्र्य दिले जाते, कोअर टीममध्ये कोण कोण मंत्री आहेत, या सगळ्य़ावरून हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरोधात ब:याच मुद्दय़ांवरून लोकांचा रोष होता, मोदींनी स्वत:चे मार्केटिंग करण्यासाठी त्याचा उपयोग केला. मोदींनी एखादी टुथपेस्ट किंवा साबणाप्रमाणो स्वत:ची विक्री केली. त्यासाठी त्यांनी मार्केटिंगचे तंत्र, जाहिरातबाजीचे कसब आणि इतरही क्लृप्त्यांचा आधार घेतला, हे सांगण्यासही मुख्यमंत्री विसरले नाहीत. (वृत्तसंस्था)
मुख्यमंत्री म्हणाले..
लोकांनी मोदी सरकारची तुलना काँग्रेस सरकारबरोबर करण्यास सुरुवात केली
आहे. जेथे मंत्र्यांना सन्मान दिला जात होता, दैनंदिन संवाद होता. त्यांच्यावर निश्चित अशी जबाबदारी होती. ते सगळे आता
गायब झाले आहे.
केवळ टि¦टरवर प्रतिक्रिया
मोदी केवळ टि¦टरवर प्रतिक्रिया देतात. हे टि¦ट नेमके त्यांनी केले आहेत की, एखाद्या कार्यक्षम अधिका:याने किंवा पक्षाच्या कार्यकत्र्याने, हे समजण्यास
वाव नसतो.
मोदी गप्प का?
परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राममंदिर, कलम 37क् यावर पंतप्रधान म्हणून मोदींनी अद्याप आपले मत स्पष्टपणो मांडलेले नाही. त्यांनी केवळ लोकांना स्वप्नं दाखविण्याचे काम केल्याचे चव्हाण म्हणाले.