शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींची पहिली ‘चाय पे चर्चा’ रंगलेली दाभडीत; पण गावकऱ्यांकडून मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:30 IST

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : पाच वर्षांत विकास कामे झाली नसल्याने रोष

- हरिओम बघेलआर्णी (यवतमाळ) : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ज्या दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा बिगूल फुंकला होता त्याच गावाने आता पाच वर्षानंतर कोणताही विकास न झाल्याने मतदानावर बहिष्काराची घोषणा केली आहे. 

दाभडी हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुका तसेच विधानसभा मतदारसंघ व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. शुक्रवारी २२ मार्च रोजी दाभडी गावात एक बैठक पार पडली. त्यात यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आर्णी पोलिसांच्या नावाने निवेदन तयार करण्यात आले असून त्यावर दाभडीचे उपसरपंच मिलिंद बागेश्वर, माजी सरपंच दिगांबर गुल्हाने यांच्यासह २५ नागरिकांच्या प्रातिनिधीक स्वाक्षऱ्या आहेत. या बहिष्कारामागे विकास कामे हे प्रमुख कारण सांगितले गेले. दाभडी येथील देवस्थान ते गावाला जोडणाऱ्या नादुरुस्त पुलाचे काम गेल्या पाच वर्षांत पूर्ण होऊ शकले नाही हा गावकऱ्यांच्या रोषाचा प्रमुख मुद्दा आहे. या पुलाबाबत चंद्रपूरचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला गेला. मात्र काम न झाल्याने अखेर वैतागून बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बैठकीतील उपस्थितांनी सांगितले. 

याशिवाय गावात अशी अनेक विकास कामे प्रलंबित असल्याचे सांगितले गेले. २०१४ ला नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यातील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. भाजपाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकरी तर सोडा गेल्या पाच वर्षांत जेथून घोषणा झाली त्या दाभडी गावालाही ‘अच्छे दिन’ आले नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम सुटला व त्यांनी थेट मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. 

 

गावातील महत्वाचा पूल गेल्या पाच वर्षात सतत पाठपुरावा करूनही पूर्ण होऊ शकला नाही. बाकी विकास कामे तर दूरच राहिली. त्यामुळेच नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला. - अतुल इंगळेशेतकरी, दाभडी ता. आर्णी 

मतदानावरील बहिष्काराबाबत ठराव झाला नाही किंवा ग्रामसभेत चर्चा झाली नाही. गावात विकास कामे सुरू आहे. त्यात पूलसुद्धा केला जाईल. हा पुल नादुरुस्त असून तो दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे हा उपाय होऊ शकत नाही, आम्ही बहिष्कार टाकणार नाही. - मंगला धकातेसरपंच, दाभडी ता. आर्णी.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकFarmerशेतकरी