शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी : यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 19:45 IST

नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व हक्क सुधारणा कायदा व सीएए कायदा

ठळक मुद्देदेशातील सामाजिक सलोखा बिघडला : पृथ्वीराज चव्हाणआर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत:अपयशी

पिंपरी : नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी गांधी शांती यात्रा सुरु केली आहे. महात्मा गांधीजींचे आफ्रिकेतून आल्यानंतर 9 जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आगमन झाले होते. त्या दिवसाचे औचित्य साधून गांधी शांती यात्रा सुरु केली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गेली सहा वर्ष जीडीपी दर घसरत चालला आहे. त्यावरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व हक्क सुधारणा कायदा व सीएए कायदा सरकारने आणला आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. मुंबई येथून निघालेल्या यात्रेचे स्वागत निगडी येथे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे,  महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, निगार बारसकर, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, सुनील शिंदे, सुनील शिर्के, देवानंद बांदल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.यशवंत सिन्हा म्हणाले, जेएनयूमधील झालेल्या हिंसक घटनेबाबत देशभर विद्यार्थी व युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारच्या मनमानी कारभाराविरूद्ध युवकांनी आवाज उठविलाच पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील सामाजिक सलोखा बिघडला आहे. केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांना संघटीत करून  शांततेच्या मागार्ने ही यात्रा जनजागृती करणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना सुरुवातीला काही अडचणी जरूर आल्या. परंतू आता  सरकारचे कामकाज सुरळीतपणे सुरु आहे. हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडYashwant Sinhaयशवंत सिन्हाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा