नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे जाणार एकाच हॉवरक्राफ्टमधून
By Admin | Updated: December 22, 2016 04:19 IST2016-12-22T04:19:43+5:302016-12-22T04:19:43+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे

नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे जाणार एकाच हॉवरक्राफ्टमधून
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच हॉवरक्राफ्टमधून जाणार आहेत.
याच हॉवरक्राफ्टमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले, राज्यसभा सदस्य संभाजीराजे भोसले आणि या समारंभाचे पौरोहित्य करणारे देवधर हेही असतील. आणखी एका हॉवरक्राफ्टमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, खा. अरविंद सावंत, आ. मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग हे असतील. (विशेष प्रतिनिधी)