नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे, तर श्रीमंतांचे पंतप्रधान!
By Admin | Updated: April 8, 2015 01:26 IST2015-04-08T01:26:41+5:302015-04-08T01:26:41+5:30
केवळ भाषणे आणि आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’ येत नाहीत, तर त्याला कृतीची जोड लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाची आणि गरिबांची चिंता नाही.

नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे, तर श्रीमंतांचे पंतप्रधान!
नाशिक : केवळ भाषणे आणि आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’ येत नाहीत, तर त्याला कृतीची जोड लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाची आणि गरिबांची चिंता नाही. ते पंतप्रधान व्हावेत म्हणून श्रीमंतांनी पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे ते गरिबांचे नव्हे, श्रीमंतांचे पंतप्रधान असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या व दिल्ली विभागाच्या अध्यक्ष शोभा ओझा यांनी केली.
महिला काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ता शिबिरात बोलताना त्या म्हणाल्या, काँग्रेसनेच तळागाळापर्यंत विकास ही संकल्पना रुजविली. महिलांना आरक्षण दिले. देशाला पुढे नेण्याची ताकद ‘नारी शक्ती’त आहे. देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान दिले. सत्तेत महिलांचा सहभाग असल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही.
महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई व्यवहारे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण करून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.