शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Narendra Modi in Pune : "गंदा है पर धंदा है"; 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 15:55 IST

Narendra Modi in Pune: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले.

पुणे: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुणे मेट्रोसह विविध विकास कामांचे उद्घाटन केले. दरम्यन, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. पण, शिवसेनेकडून कोणतीही भूमिका उघडपणे घेण्यात आली नाही. यातच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी सेनेवर निशाणा साधलाय.

राणेंचा 'प्रहार'...एरवी 'सामना'तून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जहरी टीका केली जाते. पण, आता सामनाच्या पहिल्याच पानावर पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जाहिरात झळकली. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी 'गंदा है पर धंदा है' असे म्हणत सामनाचा फोटो ट्वीट केलं आहे.

असा होता पंतप्रधानांचा पुणे दौराआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौऱ्यात पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर मोदींनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंदनगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी मेट्रोचे तिकीट स्वतः पंतप्रधान मोदींनी काढले. तसेच, मेट्रोत मोदींनी दिव्यांग मुलांशी गप्पा मारल्या. यानंतर एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मोदींनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे