शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच सगळ्यांच्या खात्यात 15 लाख येतील- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:01 IST

बँक खात्यात 15 लाख कधी येणार, हा प्रश्न साडेचार वर्षांपासून सरकारला विचारला जात आहे

सांगली: परदेशातील बँकांमध्ये भारतीयांचा इतका काळा पैसा आहे, की तो देशात आणल्यास प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये येतील, असं नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं. यानंतर 15 लाख येणार कधी, असा प्रश्न गेल्या साडेचार वर्षांपासून मोदी सरकारला विचारला जात आहे. आता या 15 लाखांवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. सर्वसामान्यांच्या खात्यात हळूहळू 15 लाख येतील, असं आठवलेंनी म्हटलं आहे. ते सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. 'देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असं आश्वासन मोदींनी 2014 मध्ये देशातील जनतेला दिलं होतं. मात्र इतकी मोठी रक्कम सध्या सरकारकडे नाही. आम्ही आरबीआयकडे पैसै मागत आहोत. पण ते द्यायला तयार नाहीत. यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे हे पैसे नागरिकांना एकाचवेळी मिळणार नाहीत. नागरिकांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होतील,' असं आठवले म्हणाले. 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी त्यांच्या अनेक सभांमध्ये 15 लाखांचा उल्लेख केला होता. परदेशी बँकांमधील काळा पैसा देशात आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. 'आम्ही सत्तेत आल्यास परदेशातील काळा पैसा देशात आणू. या पैशाचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील,' असं मोदींनी अनेक सभांमध्ये म्हटलं होतं.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक