शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंना उमेदवारी की सामंतांना? फडणवीसांच्या भेटीनंतर घेतले चार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 15:52 IST

Kiran Samant vs Narayan Rane: येत्या काही दिवसांत राणे किंवा सामंत यावरून पडदा हटणार आहे. सामंत यांनी रविवारी नागपूरला जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याने त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी भाजपा देणार अशी अटकळ बांधली गेली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिना उजाडला तरी या मतदारसंघात अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. याचे कारण म्हणजे या मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत मोठी तयारी करून बसले होते. आज याच किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीचे चार अर्ज घेऊन ठेवल्याने दोन्ही जिल्ह्यांच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

येत्या काही दिवसांत राणे किंवा सामंत यावरून पडदा हटणार आहे. परंतु, सामंत यांनी रविवारी नागपूरला जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली हे सामंत यांनी सांगितले होते. तसेच हा मतदारसंघ शिवसेनाचा असून तो आम्हालाच मिळाला पाहिजे असे फडणवीसांना सांगितल्याचे ते म्हणाले होते. भाजपच्या चिन्हावर लढणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यामुळे तिथे धनुष्यबाणच चालणार इतर कोणतेही चिन्ह नाही, असे आपण फडणवीसांना सांगितल्याचे ते म्हणाले होते. 

यामुळे राणेंना डावलून सामंतांना उमेदवारी मिळण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अशातच किरण सामंत यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दुसरीकडे नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये लोकांच्या गावागावात जाऊन गाठीभेटी घेत आहेत. यामुळे राणेंना उमेदवारी मिळणार की सामंतांना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नारायण राणे यांनी देखील चार अर्ज घेतले आहेत. 

महायुतीचे जे कोण उमेदवार असतील त्यांचेच काम करायचे आहे, हे सत्य आहे. आम्हाला तसे आदेश आहेत. थोड्या दिवसांमध्ये प्रचार करणे जिकीरीचे आहे. खूप मोठा मतदार संघ आहे. जर किरण सामंत यांचे नाव जाहीर झाले, तर तयारी असावी या अनुषंगाने फॉर्म घेतले आहेत. इकडची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी हा आमचा हक्क आहे. आमचे सगळे प्लॅनिंग तयार आहे. किरण सामंत कोणत्याही प्रकारे अपक्ष उमेदवारी करणार नाहीत, असे रत्नागिरीचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गShiv Senaशिवसेना