शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane : "उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहेच कुठे?... ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत"; नारायण राणेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 16:50 IST

Narayan Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. शिवाय धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार, असंही राणे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shivsena Uddhav Thackeray)  जोरदार निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहेच कुठे?... ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. तसेच "चांगल्या गोष्टींच कौतुक करावं. जे चित्ते उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिल. त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजे. पण, काही लोकांना चांगलं बोलता येत नाही" असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 

कोकणात नाणार रिफायनरी होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही असंही म्हटलं आहे. "उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आहेच कुठे? ज्या दिवसी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपलं. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित होतं. राज्यात देशात उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठंही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे" असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे. 

"धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार"

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. शिवाय धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार, असंही राणे म्हणाले. यासोबतच दसरा मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय कोर्टात होईल. तो शिंदे गटाच्या बाजूने लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजपासून विदर्भ दौरा सुरू केला. विदर्भात कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याकडे कसं पाहता? असा प्रश्न विचारताच राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला शुभेच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

"कोकणात नाणार रिफायनरी होणार, कोणाचाही विरोध चालू देणार नाही"

"कोकणात नाणार रिफायनरी होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार कुठंही बाहेर जाऊ नये, यासाठी मी स्वतः मंत्र्यांना भेटलो. ते संबंधित कंपनीशी पुन्हा बोलत आहेत. हीच जागा आम्ही कंपनीला द्यायला तयार आहोत" असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. माध्यमांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं तसेच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प