शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी", राणेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 15:07 IST

Narayan Rane Slams Shivsena and Uddhav Thackeray : नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई -  भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी होती. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यानिमित्त सावरकरांना अभिवादन करण्यात आलेले नाही. यावरूनच नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी" असं राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. 

नारायण राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त @CMOMaharashtra आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी" अशा शब्दांत राणेंनी जोरदार टीका केली आहे. याआधीही त्यांनी विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांच्यावर टीका करताना, मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं होतं. राणे यांनी संजय राठोड हे काही संत आहेत का, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. तसेच, याप्रकरणी 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या असून अद्यापही सरकारने कारवाई का केली नाही, असा सवाल राणेंनी विचारला होता. "संजय राठोड हे मंदिरात गेले, मंदिरात जायला ते काही संत आहेत का?. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, कोणावरही कारवाई केली जात नाही. सुशांतप्रकरणातही काय झालं, आता पूजा चव्हाण प्रकरणातही तेच होतंय."

'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'

"कुठल्याही समाजाने अशाप्रकारे बलात्काराच्या आरोपातील व्यक्तीच्या पाठिशी उभे राहू नये, असे आवाहनही राणेंनी केले. तसेच, हे सरकार शरद पवारांमुळेच बनलंय, त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरेंपेक्षा राज्यातील कुठलाही सरपंच हुशार आणि कायद्याचं अधिक ज्ञान असणारा आहे", असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तसेच, असले कसे वाघ, हे वाघ मातोश्रीवर किंवा पिंजऱ्यात घाला, असे म्हणत संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणीही राणेंनी पत्रकार परिषदेत केली होती. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना