शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करण्याची सवय'; नारायण राणेंची शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:05 IST

'युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं.'

मुंबई: काही दिवसांपूर्वी कोकणातील चिपी विमानतळाच्या श्रेय वादावरुन आणि उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळआली होती. त्यानंतर आता परत एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, अनेक दिवसानंतर मी माध्यमांसमोर आलो आहे. मागील काही दिवसांपासून काही लोकांचे फटाके ऐकत होतो. पोटनिवडणुकीत एक अपक्ष आमदार जिंकला आणि शिवसेनेनं त्याचा डंका वाजवायला सुरुवात केली. मी त्या उमेदवाराची निशाणी पाहिली, त्यात बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज आहे. पण, शिवसेनेला उगाचच दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय लागलीये, असा टोला राणेंनी लगावला.

संजय राऊत सरकलायराणे पुढे म्हणाले की, संजय राऊतांचे अग्रलेख वाचत होतो, कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे, तुम्ही एकने धडक मारणार ? संजय राऊत सरकलेला माणुस आहे. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. आता तुमचे 56 आमदार आहेत, ते मोदींमुळेच निवडून आलेत. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असंही राणे यावेळी म्हणाले.

राणेंनी हेडिंगच वाचून दाखवल्यानारायण राणेंनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत