नारायण राणे, राऊत यांचा राजीनामा
By Admin | Updated: May 17, 2014 04:24 IST2014-05-17T04:24:41+5:302014-05-17T04:24:41+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खात्यात केवळ दोन जागा आल्याने राजकीय खळबळ माजली असून मोदी त्सुनामीचा जबर फटका काँग्रेससोबतच राष्ट्रवादीलाही बसला आहे.

नारायण राणे, राऊत यांचा राजीनामा
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खात्यात केवळ दोन जागा आल्याने राजकीय खळबळ माजली असून मोदी त्सुनामीचा जबर फटका काँग्रेससोबतच राष्ट्रवादीलाही बसला आहे. या त्सुनामीचा तडाखा बसलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तो पाठवला आहे. राणे, राऊत यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वीकारलेले नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आघाडीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, देशातील काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी श्रेष्ठींकडे राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)