कोकणात नरकासुराचा पराभव
By Admin | Updated: May 26, 2014 02:45 IST2014-05-26T02:45:53+5:302014-05-26T02:45:53+5:30
ज्यावेळेला राक्षस माजले होते, त्या त्या वेळेला आई जगदंबेने अवतार घेतला. तोच अवतार या वेळेला आई भराडी मातेने कोकणातील मतदारांच्या रूपाने घेतला

कोकणात नरकासुराचा पराभव
मालवण : ज्यावेळेला राक्षस माजले होते, त्या त्या वेळेला आई जगदंबेने अवतार घेतला. तोच अवतार या वेळेला आई भराडी मातेने कोकणातील मतदारांच्या रूपाने घेतला. यामुळे कोकणातील नरकासुराचा राजकीय पराभव होऊ शकला, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली. जनतेचे आभार मानतानाच, कोकणातील गुंडागर्दीचे पर्व आता संपले असल्याचेही ते म्हणाले. कणकवली येथील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रविवारी सहकुटुंब आंगणेवाडी येथे भराडी मातेच्या दर्शनाला आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, राजन विचारे, राहुल शेवाळे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी कणकवलीत पुन्हा एकदा जाहीर सभा घेण्याची इच्छा व्यक्त केली. (प्रतिनिधी)