मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

By Admin | Updated: October 27, 2016 18:49 IST2016-10-27T18:49:22+5:302016-10-27T18:49:22+5:30

त:च्या अल्पवयीन मुलीवर सतत दीड वर्ष बलात्कार करणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील प्रकाश धनसिंग चव्हाणला मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Naradhamas life imprisonment that raped the girl | मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. २७  :  स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सतत दीड वर्ष बलात्कार करणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील प्रकाश धनसिंग चव्हाणला मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच तिघांना दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील एका अल्पवयीन मुलीवर तिचे वडील प्रकाश धनसिंग चव्हाण आणि काका सुभाष चव्हाण यांनी सतत दीड वर्ष शारिरीक अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती झाली. ही बाब  लक्षात आल्यावर आई पारूबाई चव्हाण हिने मुलीला मलकापूर पांग्रा येथील डॉ.तृप्ती दांभेरे
यांच्याकडे नेवून गर्भपात केला. सदर घटना डघडकीस येवू नये म्हणून सदर मुलीचे बायगाव बु. येथील संजय उत्तम राठोड याचेशी लग्न लावून दिले.

दरम्यान सदर पिडीत मुलीने साखरखेर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी प्रकाश चव्हाण, सुभाष पांडू चव्हाण, याचेवर भादवी कलम ३७६, ५०६,३४, ३१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपासात डॉ. तृप्ती दाभेरे यांच्या विरूध्द वैद्यकीय गर्भलींग कायदा १९७१चे क३ व ४ नुसार तसेच प्रकाश धनसिंग चव्हाण, पारूबाई चव्हाण, संजय राठोड, उत्तम राठोड, जमुना राठोड, अनिल चव्हाण यांच्या विरूध्द बाल विवाह कायदा २००६ चे क ९,१०,११ नुसार पुरावा उपलब्ध झाल्याने तत्काली पीएसआय शेलार यांनी न्यायालयात दोषारोप दाखल केले होते.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विनोद तायडे यांनी एकून २२ साक्षीदार तपासले सदर प्रकरणात आरोपी प्रकाश चव्हाण यांच्यावर भादवी ३७६ नुसार दोष सिध्द झाल्याने अ‍ॅड, विनोद तायडे यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी तसेच स्वत:चे मुलीचे वय कमी असताना तिचे लग्न लावून दिल्यामुळे आरोपी प्रकाश चव्हाण, पारूबाई चव्हाण व संजय राठोड यांना शिक्षा द्यावी असा युक्तवाद केला. विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधिश अ.शा. कलोती यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपी प्रकाश चव्हाणला जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रूपये दंड तर बाल विवाह कायद्याने ५ हजार रूपये दंड व दोन वर्षाची शिक्षा ठोठवली. पारूबाई प्रकाश चव्हाण हिला ५०० रूपये दंड, संजय राठोड याला एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विनोद तायडे यांनी काम पाहीले

Web Title: Naradhamas life imprisonment that raped the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.