शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात, पुढील टप्प्यात फळे, भाज्या, मानवी आजारांवर शोधणार उपाय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:28 IST

अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. 

 - गणेश वासनिक 

अमरावती  - कृषिक्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी नॅनो टेक्नॉलॉजीच्या प्रसारावर भर दिला जात आहे. या दृष्टीने पहिल्या टप्प्यात अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. नॅनो टेक्नॉलॉजीवरील संशोधनाचा पुढील टप्पा मानवी आरोग्याशी निगडित रोगांवर नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे उपाययोजनांवर केंद्रित केला आहे. त्यासाठी भारताने सन २००९ पासून सात देशांसोबत नॅनो टेक्नॉलॉजीवरील संशोधनासाठी सामंजस्य करार केला आहे. यामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, स्वित्झरलँड, जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, चेक रिपब्लिक या देशांचा समावेश आहे. तेथील संशोधक वेळोवेळी माहितीचे आदान-प्रदान करीत आहेत. ब्राझील येथील कॅथिनाल विद्यापीठाचे प्रा. नेस्लन दुराण यांनी या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रयोगशाळेत अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात करण्याबाबत सन २०१७ पासून संशोधन केले जात होते. अर्जेटिना येथे जाऊन त्यासंबंधी प्रयोग केल्याची माहिती महेंद्रकुमार राय यांनी दिली. या संशोधनासाठी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचे भरीव सहकार्य मिळाले. कर्नाटक येथील शेतकरी टॉम यांच्या शेतातील मातीपरीक्षण करण्यात आले. या संशोधनासाठी अनिकेत गादे यांचादेखील सहभाग आहे. पुढील वर्षी अद्रकवरील रोगावर अकोला कृषी विद्यापीठ आणि छिंदवाडा येथील कृषी विद्यापीठात संशोधन के ले जाणार आहे.

गंभीर आजारावरही उपायकारकविविध रोग, आजार लवकर बरे होण्यासाठी मनुष्य अँटिबायोटिक औषध घेतात. मात्र, ही मानवी आरोग्यास अतिशय धोकादायक बाब आहे. पेनिसिलीन, अ‍ॅमॉक्स या एकेकाळच्या तात्काळ परिणामकारक औषधांचा प्रभाव संपुष्टात आल्याचे वास्तव आहे. याला मल्टी ड्रग रेजिस्टेंस असे म्हटले जाते. नॅनो टेक्नॉॅलॉजीच्या माध्यमातून प्रतिरोधक क्षमता निर्माण करता येते. चांदीमध्ये नॅनो पार्र्टिकल्स असून, त्यास बुलेटप्रमाणे  वापर करून गंभीर स्वरुपाचे आजारावरही मात करता येते, असे संशोधक हॅकाग वाँग यांनी सिद्ध केल्याचे राय यांनी सांगितले. एचआयव्ही, कॉलरादेखील बरा करता येईल, यासंदर्भात संशोधन सुरू आहे.

नॅनो जेलद्वारे बॅक्टेरियावर मातनॅनो जेलद्वारे बॅक्टेरियावर मात करता येईल. जखमेवर हे जेल लावून प्रयोगदेखील करण्यात आला. आयरन नॅनो पार्टिकल्सद्वारे कर्करोग बरा होऊ शकतो. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. संत्री, सफरचंदावर जेलचे आवरण लावल्यास १५ ते २० दिवस हे फळ ताजे ठेवता येईल, असा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचे पेटेंट फाइल केल्याची माहिती महेंद्रकुमार राय यांनी दिली. 

नवीन संशोधनातून प्रेरणा मिळावी. विद्यापीठानेदेखील नवसंशोधक घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. संशोधन केंद्रांचे बळकटीकरण झाले पाहिजे. त्यावेळीच मानव संसाधन वाढीस लागतील.   - महेंद्रकुमार राय   फॅकल्टी फेलो, यूजीसी

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावती