चर्चगेट स्टेशनबाहेर नॅनो जळून खाक
By Admin | Updated: March 28, 2016 21:46 IST2016-03-28T21:40:40+5:302016-03-28T21:46:15+5:30
सोमवारी सकाळी चर्चगेट स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या नॅनो कारला अचानक आग लागली. आग लागल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती

चर्चगेट स्टेशनबाहेर नॅनो जळून खाक
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 28 - सोमवारी सकाळी चर्चगेट स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या नॅनो कारला अचानक आग लागली. आग लागल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही हानी झाली नाही. मात्र आग लागल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमा झाली होती. वाहतूक थांबवण्यात आल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काही वेळाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. आगीचं नेमक कारण कळू शकलेलं नाही