नंदुरबारचा संतोष ‘सीए’त देशात तिसरा

By Admin | Updated: January 20, 2015 02:34 IST2015-01-20T02:34:50+5:302015-01-20T02:34:50+5:30

द इन्स्टिट्यूट आॅफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स आॅफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

Nandurbar Santosh 'CA' third in the country | नंदुरबारचा संतोष ‘सीए’त देशात तिसरा

नंदुरबारचा संतोष ‘सीए’त देशात तिसरा

८.२३% निकाल : गुडगावचा विजेंद्र पहिला
मुंबई : द इन्स्टिट्यूट आॅफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स आॅफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. हा निकाल ८.२३ टक्के लागला. गुडगावच्या विजेंद्र अगरवाल याने ६९.७५ टक्के मिळवत देशात पहिला क्रमांक तर अहमदाबाद येथील पूजा पारीख हिने ६९.५० टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. नंदुरबार येथील संतोष नानकणी व हावडा येथील निकिता गोयल या दोघांनी ६९.१३ टक्के गुणांसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळविला आहे
डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या कॉमन प्रोफिसिएन्सी टेस्टचा (सीपीटी) निकालही जाहीर करण्यात आला असून १४.७४ टक्के लागला आहे. या परीक्षेत विजयवाडा येथील पानसा राव, काठमांडू येथील प्रणव तुलसियान आणि रायपूरच्या रोहित सोनी या तिघांनी समसमान ९४ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला. तर प्रत्येकी ९३ टक्के मिळवणारे गुंटूरच्या प्रथी साई किरण व येरासनी रेड्डी, विजयवाडा येथील मनीषा बोला यांनी यांनी दुसरा क्रमांक मिळविला. गुंटूर येथील मलीशेट्टी सूर्य प्रकाश व विजयवाडा येथील चित्तहरी महेश यांचा तिसरा क्रमांक आला.

सीपीटी परीक्षेला ३७ हजार ४१६ मुली बसल्या होत्या. त्यापैकी ५ हजार ८२0 मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांची एकूण टक्केवारी १५.५५ टक्के आहे. तर परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ५४१ मुलांपैकी ९ हजार ६0 मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांची एकूण टक्केवारी १४.२६ आहे. सीए परीक्षेतही मुलांच्या तुलनेत मुलींनी घवघवीत यश मिळविले आहे.

इयत्ता अकरावीला प्रवेश घेण्याच्या आधीच सी.ए. होण्याची मनीषा बाळगली होती. दिवस-रात्र एक करून मन लावून अभ्यास केला; आणि अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. यामागे आई-वडिलांची प्रेरणा आणि आशीर्वाद आहेत.
- संतोष प्रकाशराय नानकाणी, नंदुरबार

 

Web Title: Nandurbar Santosh 'CA' third in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.