शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांचा नंदुरबार ‘स्क्रीनिंग पॅटर्न’ राज्यभर राबविणार; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:36 IST

कोरोनाच्या परिस्थितीतही उत्तम सर्वेक्षणाचा नमुना

रमाकांत पाटील नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असतानाही नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग व युनिसेफने जिल्ह्यातील ० ते सहा वयोगटातील बालकांच्या सर्वेक्षणासाठी राबविलेली धडक मोहीम यशस्वी ठरली आहे. हा नंदुरबार पॅटर्न आता राज्यात सर्वत्र राबविण्याच्या सूचना राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या सचिवांनी दिल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीनंतर हजारो कुटुंबे रोजगारासाठी परराज्यात स्थलांतरीत होतात आणि फेब्रुवारीनंतर गावी परततात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागातर्फे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी मार्चमध्ये कुपोषित बालकांच्या सर्व्हेक्षणासाठी स्क्रिनिंग प्रक्रिया राबवितात. मात्र यंदा कोरोना व लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया लांबली. त्यातच अंगणवाड्याही बंद असल्याने ० ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्यावर व आहारावर नियंत्रण ठेवणे काहीसे अवघड झाले होते. परंतु काटेकोर नियोजन करून आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय लसीसकरण आणि सॅम व मॅम बालकांच धडक शोध मोहीमही राबविण्यात आली.कोविडची दक्षता व नियमांचे पालनकोविडच्या पार्श्वभूमीवर ही धडक मोहीम राबविण्यात आल्याने सर्व नियमांचे पालन करण्यात आले. त्यासाठी तपासणी करताना आधी बालक किंवा गरोदर माता यांची ताप, खोकला, श्वास घेण्याचा त्रास याची चौकशी करून तपासणी करण्यात आली. वजन मापे करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनंतर साहित्य निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रिपल लेअर मास्क, फेस शिल्ड, ग्लोज, सॅनिटाईझर आदी साहित्य देण्यात आले.सॅम व मॅम बालकांची शोध मोहीम तथा किशोरवयीन मुली व गरोदर मातांची आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषदेने राबविलेली विशेष धडक मोहीम चांगल्या पद्धतीने राबविली गेली. त्याची दखल महिला बालकल्याण विभागाच्या सचिवांनीही घेतली असून हाच पॅटर्न राज्यात सर्व जिल्ह्यात राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही तयार केलेला सूक्ष्म कृती आराखडा त्यांनी मागविला आहे. -विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नंदुरबार.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र