नंदुरबार जिल्ह्यात साडेपाच हजार शिधापत्रिका अपात्र

By Admin | Updated: June 27, 2016 17:52 IST2016-06-27T17:52:00+5:302016-06-27T17:52:00+5:30

जिल्ह्यातील तीन लाख ३५ हजार कुटुंबांकडे असलेल्या शिधापत्रिकांपैकी सुमारे साडेपाच हजार शिधापत्रिका शोध मोहिमेत अपात्र ठरल्या आहेत. यामुळे या शिधापत्रिकाधारकांचे

Nandurbar district is ineligible for 5000 ration card cases | नंदुरबार जिल्ह्यात साडेपाच हजार शिधापत्रिका अपात्र

नंदुरबार जिल्ह्यात साडेपाच हजार शिधापत्रिका अपात्र

ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २७ - जिल्ह्यातील तीन लाख ३५ हजार कुटुंबांकडे असलेल्या शिधापत्रिकांपैकी सुमारे साडेपाच हजार शिधापत्रिका शोध मोहिमेत अपात्र ठरल्या आहेत. यामुळे या शिधापत्रिकाधारकांचे कार्ड रद्द करण्यात आले आहे.
रेशन धान्याचा होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येत आहे. वेळोवेळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत त्या-त्या गावी शिधापत्रिकाधारक रहात आहे परंतु शिधापत्रिकेसाठी पुन्हा अर्ज केला नाही, गावी रहात नाही किंवा गाव सोडून गेल्याने, बदलीमुळे वा स्थलांतर किंवा मयत यामुळे या शिधापत्रिका अपात्र ठरत असतात. अशा अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकांचे प्रमाण तब्बल पाच हजार ६९४ आहे. आजच्या स्थितीत नंदुरबार जिल्ह्यात विविध प्रकारातील तीन लाख २९ हजार ७५५ शिधापत्रिका या पात्र आहेत. अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम ही सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Nandurbar district is ineligible for 5000 ration card cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.