शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

नंदू माधव हिंदी चित्रपटात

By admin | Updated: November 24, 2014 00:19 IST

इफ्फीत माहिती : चार्ल्सला पकडणाऱ्या झेंडेची भूमिका

संदीप आडनाईक - पणजी --ख्यातनाम मराठी अभिनेता नंदू माधव आता हिंदी चित्रपटात एन्ट्री करत आहे. बिकिनी किलर चार्ल्स शोभराज याच्या जीवनावर आधारित मै और चार्ल्स या आंतरराष्ट्रीय चित्रपटात नंदू माधव चार्ल्सला पकडणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांची भूमिका करत आहे. अभिनेता रणदीप हुडा चार्ल्स शोभराजची मुख्य भूमिका करत आहे. पूजा भट या चित्रपटाची निर्माती असून, पारवल रामन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोव्यात आलेल्या नंदू माधव यांनी ही माहिती लोकमतला सांगितली.चार्ल्स शोभराज हा बिकिनी किलर त्याच्या आयुष्यात एक दंतकथा बनून राहिला होता. ६ एप्रिल १९८६ मध्ये गोव्यात पर्वरी येथे येथील ओ ओकेआ या हॉटेलमध्ये त्याला इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी अटक केली होती. या हॉटेलमध्ये तो असल्याचा सुगावा इन्स्पेक्टर झेंडे यांना लागला होता. आग्री पाडा पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या झेंडे यांनी लागलीच गोव्याकडे धाव घेतली. नामांतर करुन उतरलेल्या चार्ल्सला त्याच्या खऱ्या नावानेच हाक मारताच त्याने झेंडे यांच्याकडे पाहिले, आणि तोच खरा चार्ल्स असल्याची खात्री पटताच झेंडे यांनी त्याच्यावर झडप घातली होती. पहाडी आवाज आणि बलदंड शरीरयष्टीच्या झेंडे यांनी १९६४ मध्ये दोनवेळा डॉन हाजी मस्तान यांना तर कुख्यात गुंड करीम लाला यांना पकडले होते. झेंडे यांनी चार्ल्सला दोनवेळा पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता हा सारा इतिहास चित्रपट निर्माते पारवल रामन यांच्या मै और चार्ल्स रसिकांना पहायला मिळणार आहे. पारवल यांनी यापूर्वी रामगोपाल वर्मा यांच्या डरना मना है, डरना जरुरी है, गायब, डार्लिंग, ४0४ एरर नॉट फाउंड या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.फॅन्ड्रीनंतर येतोय नागराज मंजुळेचा सैराटफॅन्ड्री या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराट हा चित्रपट दिग्दर्शित करत असून मुंबईच्या एस्सेल व्हिजन या निर्मिती आणि वितरण कंपनीमार्फत त्याची निर्मिती केली जाणार आहे. गोव्यात सुरु असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एस्सेल व्हिजन कंपनीचे मराठी चित्रपट विभागाचे प्रमुख निखिल साने यांनी ही माहिती दिली. सैराट ही एक प्रेमकथा असून त्याची केंद्रबिंदू एक समर्पित तरुणी आहे. या चित्रपटाच्या पटकथेवरील काम पूर्ण झाले असून पुढील वर्षापासून चित्रिकरणास प्रारंभ होईल, असे साने म्हणाले. नागराज मंजुळे यांच्या २0१३ मधील फॅन्ड्री या मराठी चित्रपटाने यशाचे शिखर गाठले. या चित्रपटाने मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्युरी ग्रॅन्ड पारितोषिक मिळविले होते. नवलाखा आर्टसचे निलेश नवलाखा आणि होली बेसिल प्रॉडक्शनचे विवेक कजारिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.