नंदुरबारमध्ये नववीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: September 9, 2015 19:43 IST2015-09-09T19:43:04+5:302015-09-09T19:43:18+5:30
नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यात नववीत शिकणा-या मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

नंदुरबारमध्ये नववीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. ९ - नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यात नववीत शिकणा-या मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पिडीत मुलगी क्लासवरुन येत असताना ही घटना घडली आहे.
अक्कलकुवा तालुक्यात आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहात नववीत शिकणारी विद्यार्थिनी विरपूरहून क्लासवरुन येत होती. गावातील विहीरीजवळ पाच नराधमांनी तिला गाठले. यानंतर तिला शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप नराधमांना अटक करण्यात यश आलेले नाही.