शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सेना-भाजपा युतीचे नंदकुमार घोडेले औरंगाबादच्या महापौरपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 15:51 IST

ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर होण्याचा मान शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना प्राप्त झाला. आतापर्यंतच्या महापौर निवडणुकांमध्ये महापौर, उपमहापौरांना जेवढे मतदान झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान घोडेले यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर होण्याचा मान शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना प्राप्त झाला. आतापर्यंतच्या महापौर निवडणुकांमध्ये महापौर, उपमहापौरांना जेवढे मतदान झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान घोडेले यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यानुसार आज त्यांना सर्वाधिक 77  मते मिळाली यासोबतच त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत  नवा विक्रम प्रस्थापित केला.तर उपमहापौर विजय औताडे यांना ही 77 मते पडली.शिवसेना-भाजप युती दुभंगण्याच्या मार्गावर असताना महापौर निवडणुकीच्या तब्बल २५ दिवस अगोदर शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे युतीचा संसार तुटता तुटता वाचला. भाजप नेत्यांची मनधरणी करून अखेर घोडेले यांनी पाठिंबा मिळविला. मागील आठवड्यात भाजपने जड अंत:करणाने घोडेले यांना पाठिंबा दिला. २५ ऑक्टोबर रोजी भाजपने निष्ठावंतांना डावलून अत्यंत नवख्या उमेदवाराला उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. विजय औताडे यांची या पदावर वर्णी लावण्यात आली आहे. यातून घोडेले यांना खूप काही फायदा झाला नाही. उलट अडीच वर्षे भाजपला तोटाच सहन करावा लागणार आहे.आज सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांना ७७ मते घेऊन विजयी झाले. तर एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना २५ व कॉंग्रेसचे अयुब खान यांना ११ मते मिळाली. विजय औताडे यांना 77 मते पडली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काम पाहिले. मागील निवडणुकांप्रमाणेच यंदाही सर्व नगरसेवकांनी हात उंचावून सभागृहात मतदान केले.शिवसेना-भाजप युतीचे सहलीवर गेलेले सदस्य सकाळीच शहरात दाखल झाली. सकाळी १०.३० वाजता सर्व युतीचे नगरसेवक एकत्र मनपात आले. सर्वच पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून व्हीप जारी केला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र