बदनापूरजवळ इंजिन फेल झाल्याने नांदेड मुंबई रेल्वेमार्ग ठप्प
By Admin | Updated: October 10, 2015 10:30 IST2015-10-10T10:30:52+5:302015-10-10T10:30:52+5:30
बदनापूर स्थानकाजवळ नागरकॉइल एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यामुळे नांदेड मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

बदनापूरजवळ इंजिन फेल झाल्याने नांदेड मुंबई रेल्वेमार्ग ठप्प
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १० - बदनापूर स्थानकाजवळ नागरकॉइल एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यामुळे नांदेड मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी सव्वासातच्या सुमारास हे इंजिन बंद पडले असून हा एकेरी मार्ग असल्यामुळे दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली असून जोपर्यंत इंजिन सुरू होत नाही तोपर्यंत प्रवाशांना दिलासा मिळणार नाही हे उघड आहे.
परिणामी धर्माबाद - मनमाड, निजामाबाद - पुणे, नगरसोल - नांदेड, मनमाड - काशीपूर या गाड्या या मार्गावर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या असून हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. औरंगाबाद, जालना आदी रेल्वेस्थानकांमध्येही प्रवासी खोळंबल्याचे वृत्त आहे.