नांदेड-मुंबई-हैद्राबाद विमानसेवा सुरू होणार

By Admin | Updated: April 24, 2017 03:20 IST2017-04-24T03:20:38+5:302017-04-24T03:20:38+5:30

येथील श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून तब्बल सात वर्षानंतर पुन्हा विमानसेवा सुरू होणार असून २७ एप्रिलपासून नांदेडहून

Nanded-Mumbai-Hyderabad flight will start | नांदेड-मुंबई-हैद्राबाद विमानसेवा सुरू होणार

नांदेड-मुंबई-हैद्राबाद विमानसेवा सुरू होणार

नांदेड : येथील श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून तब्बल सात वर्षानंतर पुन्हा विमानसेवा सुरू होणार असून २७ एप्रिलपासून नांदेडहून दररोज विमान उड्डाण करणार आहेत़ ट्रुजेट कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असून विमानतळावर अत्यावश्यक सोयीसुविधांची पाहणी केल्यानंतर त्यासाठी प्रशासनाने कंपनीला हिरवा कंदील दाखविला आहे.
देशाअंतर्गत विमानसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद पडलेल्या २४ विमानतळांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश दिले होते़ नांदेडसह सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव या शहरातील विमानसेवांचा समावेश आहे़ नांदेडात ट्रुजेट या कंपनीकडून येत्या २७ एप्रिलपासून नांदेड-हैद्राबाद, तर १ मे पासून नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Nanded-Mumbai-Hyderabad flight will start