शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 07:42 IST

Vasant Chavan : वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Vasant Chavan : नांदेड : नांदेडचेकाँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तसंच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. 

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला होता. तसंच, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता.

खासदार होण्याआधी वसंत चव्हाण महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच, वसंत चव्हाण यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, मे २०१४ मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अ‍ॅग्रीचे अध्यक्षही होते. 

वंसत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द - जन्म - 15 ऑगस्ट 1954- 1987 साली नायगाव ग्राम पंचायतीचे सरपंच , 24 वर्ष सरपंच - 1990 - जिल्हा परिषद सदस्य - 2002 विधान परिषद सदस्य ( राष्ट्रवादी ) - 2009 - विधानसभा सदस्य - अपक्ष - 2014 - विधानसभय सदस्य - काँगेस - 2024 - लोकसभा सदस्य - काँगेस

काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड- वडेट्टीवारनांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेससाठी त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत शोक भावना व्यक्त करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :vasant chavanवसंत चव्हाणNandedनांदेडcongressकाँग्रेस