नागपूरच्या महापौरपदी नंदा जिचकार
By Admin | Updated: March 5, 2017 13:21 IST2017-03-05T12:09:01+5:302017-03-05T13:21:05+5:30
नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार निवडून आल्या आहेत. आज झालेल्या महापौरपदाच्या

नागपूरच्या महापौरपदी नंदा जिचकार
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 - नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार निवडून आल्या आहेत. तर उपमहापौरपदी भाजपाचे दीपराज पार्डीकर विजयी झाले.
आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नंदा जिचकार यांनी काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांचा 82 मतांनी पराभव केला. जिचकार यांना 108 तर निकोसे यांना 26 मिळाली. तर बसपाच्या वंदना चांदेकर यांनी 10 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत दीपराज पार्डीकर यांनी काँग्रेसच्या नितीन ग्वालबन्सी यांच्यावर 80 मतांनी विजय मिळवला. निवडणुकीत पार्डिकर यांना 108, कॉंग्रेसचे नीतीश ग्वालबन्सी यांना 28, आणि बसपाचे नरेंद्र वालदे यांना 10 मते मिळाली.
नागपूर महानगरपालिकेत भाजपला बहुमत असल्याने आजची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ही केवळ औपचारिकताच ठरली होती. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने 108 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले होते.