शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:44 IST

मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

विशेष प्रतिनिधीनागपूर - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरीसाठी कलम ३२/१ नुसार भूसंपादन करण्यासंदर्भातील नोटीस ही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करूनच काढली होती. त्यांनी सादरीकरणही पाहिले. आता त्यांच्याशी बोललो म्हणजे भागेल असे वाटले होते पण आता मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकवटत प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी करीत गदारोळ केला. या गदारोळात कामकाज तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणारविषयी निवेदनाद्वारे सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री म्हणाले की प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोरही प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाईल. स्थानिक नागरिक, संस्था, संघटनांना विश्वासात घेऊनच नाणार निर्णय घेऊ. प्रकल्प लादणार नाही. प्रकल्पासाठी सुरुवातीला स्थानिकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. सहमतीदेखील झालेली होती. विरोध केवळ भूसंपादन दराबाबत होता. नंतर एनजीओ सक्रिय झाल्या. पर्यावरणाच्या मुद्यावरून विरोध सुरू झाला. त्यानंतर शिवसेनेकडून विरोध सुरू झाला.या प्रकल्पामुळे पर्यावरणावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. आंबा वा इतर फळबागा उद्ध्वस्त होणार नाहीत. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाने राज्याची अर्थव्यवस्थाच बदलेल. प्रकल्पाच्या एक-तृतियांश जमिनीवर फक्त हिरवळच असेल. या प्रकल्पासाठी गुजरात, आंध्र प्रदेशही उत्सुक होते. मात्र, केंद्राने महाराष्ट्राला पसंती दिली.समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा आधी विरोध होता पण आम्ही त्यांना प्रकल्पाचे महत्त्व समजून सांगितले. त्यांनी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे नाणारबाबतही त्यांच्याशी चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.अभूतपूर्व गोंधळ, कामकाज ठप्पमुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान न झालेल्या शिवसेना व विरोधी पक्ष सदस्यांनी नाणारविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाणारवरून सरकार अल्पमतात आले आहे. भाजपाचे १२३ सदस्य वगळता कुणाचाही प्रकल्पाला पाठिंबा नाही, असा हल्लाबोल केला. नाणार राहणार की जाणार एवढेच सांगा, असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी कोकण उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही, असे ठणकावले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाने प्रश्न प्रतिष्ठेचा न करता प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. गोंधळामुळे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले आणि नंतर गोंधळातच आटोपण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरे