शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर? अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या सभेत सहभागी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 23:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करत खासदारकी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त. ते 11 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये राहुल गांधींसोबत एका सभेला संबोधित करणार आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करत खासदारकी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त. ते 11 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये राहुल गांधींसोबत एका सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, पटोले यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट मोहन प्रकाश यांची भेट घेतल्याने पटोले यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला बळ मिळाले आहे. दरम्यान, खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांचे रात्री नागपूर विमानतळावर आगमन झाले.  त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. "आता मी मोकळा झालो आहे. 11 डिसेंबरला गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत एका सभेमध्ये सहभागी होणार असून, त्या सभेला संबोधित करणार आहे. तसेच भाजपाच्या खोटारडेपणा जनतेसमोर मांडणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. पटोले यांनी  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.  मे २०१४ ते मे २०१७ मध्ये भाजपामध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना मे महिन्यातच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या-त्या राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत पटोलेंच्या शेतकरी व ओबीसी प्रश्नावर मोदींनी हाताने इशारा करीत पटोलेंना बसायला लावले होते, तेव्हापासून नाना पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस