शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यातच राहणार-नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, खासदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नाना पटोले यांनी दिल्लीतील राजकारणाला रामराम ठोकला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, खासदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नाना पटोले यांनी दिल्लीतील राजकारणाला रामराम ठोकला. यापुढे दिल्लीत जाणार नाही, राज्याच्या राजकारणातच राहणार असल्याची घोषणा पटोले यांनी बुधवारी एका कार्यक्रमात केली.मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळविल्याबद्दल जनता दल (लोकतांत्रिक)चे आमदार कपिल पाटील यांच्या नागरी सत्काराचा सोहळा गोरेगाव येथे पार पडला. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान कार्यालयात अनेक फायली पडून आहेत. उद्योगपती अंबानी यांची इच्छा असेल, त्याच फायलींचा निपटारा केला जातो. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर कोणत्याच खासदाराला बोलता येत नाही. खासदारांच्या बैठकीत वयस्कर आणि ज्येष्ठ खासदारांचाही अपमान केला जातो. देशात अघोषित आणीबाजी लागू झाली. यापुढे राज्यातच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते फुले पगडी घालून शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.लोकशाहीचे चारहीस्तंभ धोक्यात - मुंडेसरकारविरोधी बोलणारा प्रत्येक आवाज दाबला जात आहे. नाना पटोले यांनीच सर्वप्रथम मोदींविरोधात बोलण्याचे धाडस केल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत. संविधानही धोक्यात आले आहे. संविधानाला विरोध करणाºया मंडळींना पंतप्रधान मोदी यांनी आजच्या भाषणातून ठणकवायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. आजची अराजकता पाहता, निर्वाणीच्या लढाईला तयार राहावे लागेल, असे धनंजय मुंडे म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnewsबातम्या