शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात BJPचा पराभव करुन काँग्रेस सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 16:56 IST

Nana Patole: महाराष्ट्रात कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरलेले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Nana Patole: कर्नाटमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली असून जनतेच्या आशा आकांशा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसचे हे नवे सरकार करेल. भाजपाच्या भ्रष्टाचारी, धर्मांध, जातीयवादी सरकारला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला घवघवशीत यश दिले आहे. आगामी विधानभा निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही परिवर्तन घडवेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

बंगरुळूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर लाखो लोकांच्या साक्षीने सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तसेच डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची व काँग्रेसच्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसह महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत जनताच पराभव करेल

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारने कर्नाटकात डबल भ्रष्टाचार केला व जनतेचा पैसा लुटला. सामान्य जनतेच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करुन केवळ धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली परंतु कर्नाटकची सुज्ञ जनता भाजपाच्या भुलथापांना बळी पडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रातील डझनभर मंत्री यांनी प्रचारसभांचा धडाका लावला पण कर्नाटकच्या जनतेवर त्याचा काहीही फरक पडला नाही. महाराष्ट्रातही कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरलेले आहे. भाजपाप्रणित शिंदे सरकारचा आगामी निवडणुकीत जनताच पराभव करेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस सरकार जनतेला दिलेली पाच महत्वाच्या आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेटपासूनच सुरु होईल. जनतेला दिलेली आश्वासने पाळणारे काँग्रेस सरकार असून महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार असताना दिलेल्या आश्वासनानुसार पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला होता. राज्यात सध्या असलेले शिंदे सरकार शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला, छोटे व्यापारी यांना उद्ध्वस्त करणारे आहे. या सरकारला आगामी निवडणुकांत कर्नाटकाप्रमाणेच त्यांची जागा दाखवून जनता काँग्रेसला विजयी करेल, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण