मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नाना आंबोले यांची निवड
By Admin | Updated: April 14, 2017 16:07 IST2017-04-14T16:03:46+5:302017-04-14T16:07:28+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून भाजपामध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक नाना आंबोले यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नाना आंबोले यांची निवड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून भाजपामध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक नाना आंबोले यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गुरुनाथ मिठबावकर यांची सचिवपदी निवड झाली आहे. लालबाग-परळमध्ये दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या नाना आंबोले यांना तिस-यांदा पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती.
पण पक्षाने परळ-लालबागमध्ये सिंधु मसुरकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी करुन भाजपामध्ये प्रवेश केला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत नाना आंबोल यांची पत्नी तेजस्विनी आंबोले यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
यात तेजस्विनी आंबोले यांचा चार ते साडेचार हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. नाना आंबोले यांनी शिवसेनेकडून प्रभाग समिती अध्यक्षपदासह बेस्टचे चेअरमनपदही भूषवले आहे.