केडीएमसीच्या विविध उपक्रमांच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यातून लोकप्रतिनिधींची नावे गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 09:18 PM2021-09-06T21:18:59+5:302021-09-06T21:19:36+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

names of the representatives were not at the online public dedication ceremony of various initiatives of KDMC | केडीएमसीच्या विविध उपक्रमांच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यातून लोकप्रतिनिधींची नावे गुल

केडीएमसीच्या विविध उपक्रमांच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यातून लोकप्रतिनिधींची नावे गुल

Next

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने छापलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर लोकप्रतिनिधींचे नावे नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

कोपर पूल, रुक्मीणीबाई रुग्णालय, क्रिडा संकुलातील प्राणवायू प्रकल्प, आय वार्डातील नागरी आरोग्य केंद्र, शास्त्रीनगर रुग्णालयातील अत्याधुनिक  शस्त्रक्रिया गृह, टिटवाळा अग्नीशमन केंद्र, आंबिवली जैव विविधता उद्यान, तेजस्वीनी बसेस आदीचे लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री कपील पाटील, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार गणपत गायकवाड, रविंद्र चव्हाण, राजू पाटील, विश्वनाथ भोईर यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. ही कामे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली आहे असा दावा म्हात्रे यांनी केला आहे. त्याच प्रमाणो त्यावेळी माजी महापौर विनिता राणो या देखील होत्या. लोकप्रतिनिधींची नावेच या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासनाने असा दुजाभाव करणो. लोकप्रतिनिधींचा विसर करणो कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या या कृतीविषयी म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

मात्र महापालिकेतील सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने लोकप्रतिनिधींच्या नावे कार्यक्रम पत्रिकेवर नाहीत. हीच बाब या यातून समोर आली आहे.
 

Web Title: names of the representatives were not at the online public dedication ceremony of various initiatives of KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.